Advt.

Advt.

सोमवार, १९ मे, २०१४

इन्सल्ट

-महावीर सांगलीकर 


आज दिशाला तिचं विश्लेषण द्यायचं, त्यानंतर तिच्याशी संबंध तोडायचे असे मी ठरवलं होतं. शक्यतो गोडीत. नाही जमलं तर दुसरा मार्ग आहेच.

हे बघ दिशा, तू आजवर तुझ्या पूर्वजन्मांचं मला जे कांही सांगितलं आहेस, ते खरं असू शकतं किंवा तो तुझा भ्रमही असू शकतो. पुनर्जन्म जर खरोखरच होत असेल तर तुझी कथा खरी असण्याची जास्त शक्यता आहे
पुनर्जन्म खराच आहे कारण मी तो अनुभवलाय आणि आजही मला आधीचे जन्म आठवतात हे तुम्हाला माहीत आहे
तुझं म्हणणं खरं मानू. पण मग हा तुझा एकविसावा जन्म आहे आणि न्यूमरॉलॉजीकली बघितलं तर तुझी मुक्ती ही तुझ्या पुढच्या जन्मातच होवू शकते, कारण तो तुझा बाविसावा जन्म असेल आणि बावीस हा तर तुझा लकी नंबर आहे
तुमचं हे म्हणणं पटतंय मला. पुढच्या जन्मी तर पुढच्या जन्मी. पण मग या जन्मात आपण नुसतीच भेट घ्यायला काय हरकत आहे...?’
म्हणजे पुन्हा मला एप्रिल फूल बनवायचं आहे का?’
तुम्ही मला अनेक वेळा पुढच्या जन्मी भेटू असं म्हणत मूर्ख बनवलं आहे... मी फक्त एकदा एप्रिल फूल बनवलं.... एप्रिल फुल विसरून जा आता. नाऊ आय एम सिरिअस.....  आपण खरंच भेटूया.. कुठं भेटायचं ते तुम्हीच ठरवा. चिंचवड, पुणे, मुंबई, लोणावळा... तुम्ही म्हणाल तिथं
दिशा, मला जर तुला खरंच भेटायचं असतं तर मी तुला आती क्या खंडाला?’ असं विचारलं असतं. पण मला तुला भेटावं असं वाटतच नाही. आपली भेट झाली तर या जन्मातही पुन्हा कांहीतरी विचित्र घटना घडतील आणि तुला दु:ख भोगावं लागेल अशी भीती मला वाटते
मलाही तसंच वाटतं... पण ती रिस्क घ्यायला मी तयार आहे..
पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. म्हणजे बघ, तुझं कांही वाईट व्हायला नको अशी माझी इच्छा तर आहेच, पण माझंही कांही बरंवाईट व्हायला नको असंही मला वाटतं. तू मला स्वार्थी म्हण पाहिजे तर... बट आय विल नेव्हर मीट यू इन धिस बर्थ
ठीक आहे, नका भेटू... यू डोन्ट लव्ह मी अॅ  ऑल
यु नो वेल वेदर आय लव्ह यू ऑर नॉट
‘.........’
ते सोडून दे.... पुढं ऐक.. तुझ्या बाबतीत आणखी एक वेगळी शक्यता देखील असू शकते
कोणती
म्हणजे एखादेवेळेस ते पुनर्जन्म वगैरे तुझे भ्रम असू शकतात
इंपॉसिबल..
पॉसिबल... म्हणजे बघ तुझं वाचन जबरदस्त आहे. तू वेवेगळ्या विषयांवरचं बरंच कांही वाचलं आहेस, वाचत असतेस. लहानपणापासून..... कथा, कादंबऱ्या, इतिहास, धर्म, तत्वज्ञान, गुढविद्या, रहस्यकथा.... आणखी बरंच कांही... आता तर तू कथाही लिहीत असतेस
मग? त्याचा  इथं काय संबंध?’
तू ज्यांना पूर्वजन्म समजतेस, त्या प्रत्यक्षात तुझ्या सुप्त मनात तयार झालेल्या काल्पनिक कथा आहेत. पण त्या गोष्टी ख-याच घडलेल्या आहेत असे तुला वाटत असतं
‘........’
मला तुझं कौतुक वाटतं.. त्या कथा इतक्या परफेक्ट आहेत की खऱ्याच वाटाव्यात. इतक्या परफेक्ट कथा बनण्याचं कारण म्हणजे तू उत्कृष्ट स्टोरी टेलर आहेस आणि तुझ्या ज्ञानाचा तर प्रश्नच नाही
तुम्ही असं पटवून सांगत असता की ते खरंच वाटावं... पण मिस्टर महावीर, त्या काल्पनिक कथा नाहीत हो.... त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत
थांब.... तुझी ती पहिल्या जन्माची कथा.... त्यातल्या अनेक गोष्टी इतिहासात प्रत्यक्षात घडलेल्या आहेत.... पण तुझ्या बाबतीत नव्हे. तुझ्या सुप्त मनानं वेगवेगळ्या घटना एकत्र करून एक नवीनच गोष्ट बनवली. ती म्हणजेच तुझा पहिला जन्म...
नाही हो....
तसंच आहे. तुझी ती गोष्ट म्हणजे एक हजार वर्षांपूर्वीचा जैन-वैष्णव-शैव यांच्यातील धार्मिक संघर्ष, शिलाहार राजकन्या चंद्रलेखा आणि चालुक्य राजकुमार विक्रमादित्य यांचं लग्न, राणी अबक्का, गांधीजींचा खून, इंदिरा गांधींचा खून अशा अनेक गोष्टींचं परम्युटेशन- कॉम्बीनेशन आहे....
‘...........’
तसंच तुझी ती लाजवंती बाईची गोष्ट... ती  दुसरं महायुद्ध, त्यातील भारतीय सैनिकांचा सहभाग, राजपूत लोक यांच्या तुला असलेल्या माहितीतून तयार झालेली आहे. 1858 ची गोष्ट... तीही तुझ्या सुप्त मनात तयार झालेली गोष्ट आहे, पण तिला तू तुझा मागचा जन्म समजतेस
पण मग तारखा... साल... त्यांचं काय?’
तुला  न्यूमरॉलॉजीचे बेसिक ज्ञान आहेच. त्यामुळं तुझ्या सुप्त मनानं कथेत त्या-त्या काळातील तुला योग्य अशा तिथ्या किंवा तारखा निवडलेल्या दिसतात. तू बहुतेक वेळी स्वत:साठी 1 ही तारीख किंवा तिथी निवडलेली दिसते, याचं कारण म्हणजे एक हा अंक सर्वात महत्वाचा आहे आणि तो सर्वात सेंटरला असतो. तुला सेंटरला रहाणे आवडतेही. एक हा अंक चारकडे आकृष्ट होत असल्याने तो तू मला बहाल करून टाकलेला दिसतो. तुझ्या कथेत दरवेळी 22 या अंकाचा कांहीतरी रोल असतो, कारण हा अंक आपल्या दोघांशी संबंधीत आहे’.
‘............’
आणखी एक गोष्ट म्हणजे तुला जोडीदाराच्या मृत्यूचं जबरदस्त आकर्षण आहे. त्याचा मृत्यू हा तुझ्या सर्व कथांचा मुख्य भाग आहे. प्रत्येक कथेत तू तुझ्या जोडीदाराला मारून टाकतेस. पहिल्या जन्माच्या कथेत तर तू जोडीदारा बरोबरच इतर अनेक मोठमोठ्या लोकांना मारून टाकलं आहेस. वेगवेगळ्या प्रकारे. कथाकाराने केलेले हे खूनच आहेत. यु आर अ मर्डरर.... तुझ्या एकाही जन्मात तुला भाऊ नाही. त्याचं कारण तुला या जन्मात भाऊ नाही आणि तो नाही याचा तुला आनंद वाटत असतो हेच आहे
मला तुमचं हे विश्लेषण पटत नाही... कधीच पटणार नाही... पण मी जे म्हणते ते तुम्हाला एक ना एक दिवस पटेल. खात्री आहे माझी. पण तुम्हाला पटेल तोपर्यंत खूपच उशीर झालेला असेल
मला वाटतं, तुला मानसोपचाराची गरज आहे
‘... तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही. फरगेट ऑल धिस... आता शेवटचं विचारते तुम्हाला ... तुम्ही मला भेटणार आहात की नाही...?’
दिशा, मी तुला अजून किती वेळा सांगू की मला तुला भेटण्याची इच्छा नाही...
प्लीज... आपण फक्त एकदाच भेटू.... नंतर पुन्हा कधीच भेटायचं नाही....
हे म्हणजे फक्त एकदाच मरू... पुन्हा कधी मरायचं नाही असं म्हणण्यासारखं आहे
बी सिरिअस... कधीही कसले जोक्स करता...
आय एम सिरिअस... फक्त तुझं टेन्शन घालवण्यासाठी तसे बोललो..
एवढी काळजी आहे तर भेटावं येऊन
हे बघ दिशा, तुझा पुनर्जन्मावर पक्का विश्वास आहे ना?’
हो..
मग थांब की आणखी 50-60 वर्षे. तोपर्यंत मी मरेनच. तू येशीलच माझ्या मागोमाग पुढच्या जन्मात. मग आपण भेटू... त्यावेळी तू म्हणशील तसं होईल’.
‘.......’
इतके जन्म थांबलीस... अजून 50-60 वर्षे कळ काढ...
नाही थांबणार...
मीही तुला नाही भेटणार..
मी पुण्याला तुमच्या घरी येईन... अचानक..
एक एप्रिलला आली होतीस तशीच ना? तशी येणार असशील तर माझी हरकत नाही
तशी नाही... खरोखरच येईन
वेल, तुला माहीत आहे मला इंट्यूशन होत असतं.. त्यामुळं तू कधीही आलीस तरी मी तुला सापडणारच नाही. मी त्यावेळी कुठंतरी दूर, टूरवर किंवा गावी गेलेलो असेन. उगीच तुझा हेलपाटा होईल’.
मिस्टर महावीर, मला भेटायला तुम्ही काय घ्याल?’
व्हाट डू यू मीन?’
आपण सिंगापूरला जायचं का? आपण तिथं भेटू... मी सगळा खर्च करेन
लाच...? प्रियकराला भेटण्यासाठी...? सॉरी, मला हे मान्य नाही...
मग तुम्हाला काय पाहिजे?’
सुटका.. तुझ्यापासून मला सुटका पाहिजे...
मिस्टर महावीर... हे तुम्ही काय बोलत आहात? तुमची सुटका करायला मी कुठं तुम्हाला डांबून ठेवलंय?’
दिशा, गेले तीन महिने तू व्हर्च्युअली मला बांधून ठेवलं आहेस. माझं माझ्या कामावर लक्ष नाही. जेवणाचंही भान नाही. झोपेत पण तुझाच विचार...  दिवसभर सायबर कॅफेत बसून तुझ्याशी चॅटिंग करायचं, रोज रात्री दोन-तीन तास फोनवर बोलायचं.. पैसे जातात त्याची मला फिकीर नाही... पण हे असं किती दिवस चालायचं... आता तूच सोडव मला याच्यातनं...
मिस्टर महावीर, गेले तीन महिने माझी काय अवस्था झालीय हे तुम्हाला माहीत आहे काय?’
मी समजू शकतो... पण आता बस्स झालं. वुई शुड स्टॉप ऑल धिस नॉनसेन्स
आपण खरंच हे थांबवू या.. पण आधी भेटूया... एकदाच
सॉरी.. ते नाही जमणार.... प्लीज... नाहीतर मला तुझ्याशी भांडण करावं लागेल. तुझा इन्सल्ट करावा लागेल...
मी मागं तुम्हाला बोलले होते... डोन्ट हर्ट मी... इफ यु डू सो, यु विल बी नो व्हेअर’ 
चालेल... माझं काय व्हायचं ते होवो, पण आता बस्स झालं. सध्या माझी जी वाईट अवस्था झाली आहे त्याच्यापेक्षा तर वाईट कांही नाही होणार...... कधी कधी वाटतं मी तुझ्या इमेलला उगीचच उत्तर दिलं. ते दिलं नसतं तर आपल्या दोघांच्या दृष्टीने चांगलं झालं असतं. दिशा तू का आलीस परत माझ्या जीवनात?’
असाच प्रश्न मी पण विचारू शकते... आहे उत्तर तुमच्याकडं?’
‘.....’
प्लीज..... मी आताच सिंगापूरची तिकिटे बुक करायला सांगते. आपण भेटू... मग आपले मार्ग वेगळे...
ओके दिशा... आय ह्याव चेंजड माय माइंड... मी तुला भेटायला तयार आहे. पण सिंगापूरला जायची गरज नाही.... तसाही माझ्याकडं पासपोर्ट वगैरे नाही आहे... आपण खंडाळ्याला भेटू... पण माझी एक अट आहे...’ 
सांगा... तुमची कोणतीही अट मला मान्य आहे
माझा कांहीतरी फायदा व्हायला पाहिजे
वेल, सांगा काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून...
तूच सांग. तू काय देवू शकतेस मला?’
मनी? हाऊ मच मनी  डू यू वांट?’
तुला माहीत आहे मी मनी ओरिएंटेड माणूस नाही आहे
वेल, मी तुम्हाला युरोपच्या टूरवर पाठवेन...तुम्ही पासपोर्ट काढून घ्या
नको... आय एम नॉट इंटरेस्टेड
मग तुम्हाला काय पाहिजे..?’
ते तूच ठरवायचं आहेस. मला पटलं तर मी हो म्हणेन...
ओके... मी तुमचं एखादं पुस्तक प्रकाशित करेन
नो वे... आय राईट ओन्ली फॉर प्रोफेशनल पब्लिशर्स
मग तुम्हाला पाहिजे तरी काय? डू यु वांट टू स्लीप वुईथ मी?’
दिशा, तू शुद्धीत आहेस का? इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं वाटलं नव्हतं मला... छे, काय फालतू पोरगी आहे ही... गिरी हुई औरत....  आज पासून तुझा आणि माझा काडीचाही संबंध नाही..... गेट लॉस्ट ... परत जर माझ्या मेसेंजरमध्ये दिसलीस तर बघ
वाह मिस्टर महावीर... यू आर ओव्हर स्मार्ट. तुमची चाल आली माझ्या लक्षात.... माझ्याच तोंडून माझा इनसल्ट करायला लावलात... यू हॅव डन अ ग्रेट मिस्टेक...  आता बघा मी तुमची कशी वाट लावते ते...
कर तुला काय करायचं ते... माझ्याकडंपण दुसरा ऑप्शन नव्हता... तुला हर्ट करण्याशिवाय.. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इट... नाऊ गेट लॉस्ट... सुखानं जगू दे मला.. तूही सुखानं जग. लव्ह यू... टेक केअर, बाय.. सी यू इन द नेक्स्ट बर्थ

दिशा मेसेंजर मधून गायब झाली... मी सुटकेचा श्वास सोडला. आता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. आज आपण जे केलं ते चुकीचंच होतं, पण ते करण्याची गरजही होती. डोक्यावरचं एक ओझं कमी झालं होतं. तिनं दिलेल्या धमकीकडं सिरीअसली बघण्याची गरजही नव्हती. करून करून काय करणार आहे ती?



पुढे चालू.....
या दीर्घ कथेचे आधीचे भाग:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा